• न्यूझीलंडने भारताचा पराभव करत ICC मार्फत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विश्व कसोटी स्पर्धेच्या (World Test Championship - WTC) विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

ठळक मुद्दे

  • न्यूझीलंडने १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८ गडी राखून भारताचा पराभव केला.

  • पावसाच्या व्यत्ययामुळे सामना नियमित ५ दिवसांच्या ठिकाणी ६ दिवस आयोजित करण्यात आला होता.

  • न्यूझीलंडच्या काइले जेमीन्सनला 'सामनावीर' तर केन विल्यमसनला 'मालिकावीर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इतर महत्वाचे मुद्दे

  • न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्रमवारीतील अव्वल ३ संघ ठरले आहेत.

  • सदर अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन येथे खेळविण्यात आला.

  • २०२१-२०२३ या कालावधीदरम्यान पुढील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा संपन्न होणार आहे.