• नायजेरियन अर्थशास्त्रज्ञ न्गोजी ओकोंजो-इव्हिला यांची जागतिक व्यापार संघटनेच्या (World Trade Organization - WTO) नूतन महासंचालक (Director-General) पदावर निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आफ्रिकन महिला ठरणार आहेत.

  • मावळते महासंचालक रॉबर्टो अझेवेडो यांची त्या जागा घेतील.

WTO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: WTO म्हणजेच World Trade Organization अर्थात जागतिक व्यापार संघटना होय.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी १९९५ रोजी WTO ची स्थापना करण्यात आली होती.

  • महासंचालक: न्गोजी ओकोंजो-इव्हिला या सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WTO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सदस्यत्व: सध्या १६४ देश WTO चे सदस्य आहेत.