-
अमेरिकेतील भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ श्री. अनिल सोनी यांची नव्याने निर्मित 'जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO) फाउंडेशन' चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. सोनी यापूर्वी अमेरिकेतील व्हायट्रिस या जागतिक आरोग्य सेवा कंपनीत काम करत होते.
-
तिथे त्यांनी जागतिक संसर्गजन्य रोगांचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
-
१ जानेवारी २०२१ पासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची भूमिका स्वीकारतील.
WHO फाउंडेशन बाबत महत्वपूर्ण माहिती
-
WHO फाउंडेशनची स्थापना मे २०२० मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे स्वतंत्र अनुदान देणारी एजन्सी म्हणून करण्यात आली होती.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम हे सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.