-
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघामार्फत (International Hockey Federation - FIH) २०२३ सालच्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा ओडीशा येथे आयोजित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
भुवनेश्वर आणि रुरकेला या २ ठिकाणी सदर स्पर्धा आयोजित केली जाईल अशी अपेक्षा आहे.
-
पुरूष हॉकी विश्वचषक स्पर्धा २०१८ चे देखील आयोजन ओडीशातर्फे करण्यात आले होते.
-
२०२३ सालची स्पर्धा पुरुषांच्या FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेची १५ वी आवृत्ती असेल.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.