-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने २२००० आंतरराष्ट्रीय धावा बनवत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
ठळक मुद्दे
-
कोहलीने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आणि आपल्या ४६२ व्या डावात २२००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा वेगवान फलंदाज बनला.
-
सचिन तेंडुलकरने ४९३ डावांमध्ये २२००० धावा पूर्ण केल्या होत्या.
-
सचिनपाठोपाठ वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा (५११ डाव) आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (५१४ डाव) या यादीत आहेत.
-
कोहलीने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने कसोटीत ७२४०, एकदिवसीय सामन्यात १२८३४ आणि टी-२० मध्ये २७९४ धावा बनवल्या आहेत.
-
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसर्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ही भरीव कामगिरी केली आहे.
-
२२००० आंतरराष्ट्रीय धावांचा पल्ला गाठणारा कोहली हा जगातील आठवा आणि तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.