-
१९८८ च्या तुकडीचे IAS अधिकारी असणाऱ्या राजेश खुल्लर यांची जागतिक बँकेमध्ये (World Bank) कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointment Committee of the Cabinet - ACC) राजेश खुल्लर यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.
-
३ वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
-
सध्या खुल्लर हे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रधान सचिव पदावर कार्यरत आहेत.
-
जागतिक बँकेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते रुजू होतील.
जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती
-
अध्यक्ष: डेव्हिड मालपास हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन डी.सी., युनायटेड स्टेट्स हे जागतिक बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: जुलै १९४४ मध्ये जागतिक बँकेची स्थापना झाली होती.
-
ब्रीदवाक्य: 'Working for a World Free of Poverty' हे बँकेचे ब्रीदवाक्य आहे.