-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) समीर कुमार खरे यांना आशियाई विकास बँकेत (Asian Development Bank - ADB) नवे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
समीर कुमार खरे हे १९८९ च्या बॅचचे आसाम केडरचे IAS अधिकारी आहेत.
-
अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागात अतिरिक्त सचिव पदावर सध्या ते कार्यरत आहेत.
-
३ वर्षांच्या मुदतीसाठी या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आशियाई विकास बँकेबाबत (ADB) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ADB म्हणजेच Asian Development Bank अर्थात आशियाई विकास बँक होय.
-
अध्यक्ष: मसात्सुगु असकावा हे सध्या ADB च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९ डिसेंबर १९६६ रोजी ADB ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: फिलीपाईन्स हे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सेवा प्रदान कार्य प्रदेश: आशिया-पॅसिफिक या क्षेत्राला ADB सेवा प्रदान करते.
-
सदस्य देश: सध्या ADB चे ६८ सदस्य देश आहेत.