• अखिल भारतीय फुटबॉल महासंघामार्फत (All India Football Federation - AIFF) भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India - SAI) च्या सहयोगातून 'ई-पाठशाला' वेब प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर उपक्रम हा फुटबॉलमधील कोचिंग कार्यक्रम आहे

  • सर्जनशीलता ओळखण्यासाठी आणि मुलांची फुटबॉलमध्ये आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

  • माझे फुटबॉल कल्चर, माझी कौशल्ये आणि माझे प्रशिक्षण या तीन भागात हा कार्यक्रम विभागण्यात आला आहे.

AIFF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AIFF म्हणजेच All India Football Federation अर्थात अखिल भारतीय फुटबॉल महासंघ होय.

  • स्थापना वर्ष: १९३७ साली AIFF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दिल्ली येथे AIFF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: प्रफुल पटेल हे सध्या AIFF च्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत.

SAI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SAI म्हणजेच Sports Authority of India अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरण होय.

  • स्थापना वर्ष: १९८२ साली SAI ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे SAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.