-
जागतिक बँकेमधील अर्थतज्ज्ञ दीपक मिश्रा यांची आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध भारतीय संशोधन परिषदेचे (Indian Council for Research on International Economic Relations - ICRIER) पुढील संचालक आणि मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२०१२ पासून ICRIER चे संचालक आणि मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या रजत कथुरिया यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.
ICRIER बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICRIER म्हणजेच Indian Council for Research on International Economic Relations अर्थात आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध भारतीय संशोधन परिषद होय.
-
स्थापना वर्ष: ऑगस्ट १९८१ मध्ये ICRIER ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे ICRIER च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.