-
वरिष्ठ आय. पी. एस अधिकारी एम. ए. गणपती यांची नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या (National Security Guard - NSG) महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
१९८६ च्या उत्तराखंड केडरचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी असणारे गणपती हे सध्या नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो (Bureau of Civil Aviation Security - BCAS) च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
२०२४ सालापर्यंत ते राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालक पदावर कार्यरत राहतील.
NSG बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NSG म्हणजेच National Security Guard अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NSG च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९८६ साली NSG ची स्थापना करण्यात आली होती.
-
ब्रीदवाक्य: 'सर्वत्र सर्वोतम सुरक्षा' हे NSG चे ब्रीदवाक्य आहे.