• भारत सरकारमार्फत आशिष चांदोरकर यांची खासगी व्यक्ती म्हणून जागतिक व्यापार संघटनेतील (World Trade Organisation - WTO) भारताच्या कायमस्वरुपी मिशनमध्ये समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नियुक्ती ३ वर्षांसाठी करण्यात आली आहे.

  • सदर मिशनमध्ये प्रथमच खासगी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.

  • चांदोरकर हे 'स्माही फाउंडेशन ऑफ पॉलिसी रिसर्च' या बेंगळुरू-आधारित धोरण विचार गटाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

WTO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: WTO म्हणजेच World Trade Organization अर्थात जागतिक व्यापार संघटना होय.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी १९९५ रोजी WTO ची स्थापना करण्यात आली होती.

  • महासंचालक: न्गोजी ओकोंजो-इव्हिला या सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WTO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सदस्यत्व: सध्या १६४ देश WTO चे सदस्य आहेत.