-
राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाचे (National Dairy Development Board - NDDB) अध्यक्ष दिलीप रथ यांची जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघाच्या (International Dairy Federation - IDF) मंडळावर एकमताने निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. रथ हे गेल्या १० वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय समितीचे सदस्य सचिव आणि दुग्ध धोरण व अर्थशास्त्रविषयक स्थायी समितीचे सदस्य म्हणून IDF शी संबंधित आहेत.
-
जागतिक दुग्ध उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
IDF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IDF म्हणजेच International Dairy Federation अर्थात आंतरराष्ट्रीय दुग्ध संघ होय.
-
स्थापना वर्ष: १९०३ साली IDF ची स्थापना करण्यात आली होती.
-
अध्यक्ष: पियर्कीस्टियानो ब्राझझेल हे सध्या IDF च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: ब्रुसेल्स, बेल्जियम येथे IDF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.