• भारतीय निवडणूक आयोगात (Election Commission of India - ECI) उमेश सिन्हा यांची उप निवडणूक आयुक्त पदावर (Deputy Election Commissioner) नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • उमेश सिन्हा हे १९८६ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत सिन्हा यांच्या उप-निवडणूक आयुक्तपदाच्या मुदतीत ६ महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.

  • सिन्हा हे निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतच्या मुद्द्यावर विचारमंथन करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे नेमलेल्या समितीचा एक भाग आहेत.

ECI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग

  • मुख्य निवडणूक आयुक्त: सुनील अरोरा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.