• नोझोमी ओकुहाराने 'डेन्मार्क ओपन (Denmark Open) २०२०' च्या महिला एकेरीमध्ये आणि अँडर्स अँटोनसेनने पुरुष एकेरीमध्ये विजेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • बॅडमिंटनमध्ये जपानची माजी वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या नोझोमी ओकुहाराने महिला एकेरीत डेन्मार्क ओपन २०२० चे विजेतेपद जिंकताना ३ वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या कॅरोलिना मरिनला पराभूत केले आहे.

  • पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असणाऱ्या डेन्मार्कच्या अँडर अँटोनसेन याने रॅसमस गेम्के याचा पराभव केला आहे.

स्पर्धेतील विजेत्यांची यादी

  • महिला एकेरी: नोझोमी ओकुहारा (जपान)

  • पुरुष एकेरी: अँडर अँटोनसेन (डेन्मार्क)

  • पुरुष दुहेरी: मार्कस एलिस आणि ख्रिस लैंग्रिज (इंग्लंड)

  • महिला दुहेरी: युकी फुकुशिमा आणि सयाका हिरोटा (जपान)

  • मिश्र दुहेरी: मार्क लॅमसफस आणि इसाबेल हर्टट्रिच (जर्मनी)