-
जनता दलाचे प्रमुख असणाऱ्या नितीशकुमार यांनी नुकतीच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
ठळक मुद्दे
-
नितीशकुमार आपल्या सातव्या कार्यकाळाला प्रारंभ करत आहेत.
-
पटनामधील राजभवनात बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांनी नितीशकुमार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
-
भाजपचे विधानसभा नेते तारकिशोर प्रसाद आणि उपनेत्या रेणू देवी यांची नूतन उपमुख्यमंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
बिहार राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: फागु चौहान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.
-
मुख्यमंत्री: नितीशकुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
-
स्थापना वर्ष: १९१२ साली बिहार राज्याची स्थापना करण्यात आली होती.
-
राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १९५० साली बिहारला राज्य दर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: पटना ही बिहारची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने बिहारचा देशात १२ वा क्रमांक लागतो.