-
स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत (State Bank of India - SBI) श्री. चरणजितसिंग अत्रा यांची नूतन मुख्य वित्तीय अधिकारी (Chief Financial Officer - CFO) पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
माजी उपकार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रशांत कुमार यांची मार्च २०२० मध्ये येस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त होते.
-
सी. व्यंकट नागेश्वर हे अंतरिम स्थितीत सदर पदावर कार्यरत होते.
SBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SBI म्हणजेच State Bank of India अर्थात भारतीय स्टेट बँक होय.
-
अध्यक्षः रजनीश कुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.
-
संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.
-
सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा SBI मार्फत पुरवल्या जातात.