• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. मनसुख मांडवीय यांची नुकतीच 'स्टॉप टीबी पार्टनरशिप बोर्ड (Stop TB Partnership Board)' च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • मांडवीय यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची जागा घेतली आहे.

  • भारताने २०२५ पर्यंत टीबी संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून संयुक्त राष्ट्र संघामार्फत २०२३ पर्यंत टीबी संपवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

  • क्षयरोगाविरूद्ध सामूहिकपणे लढणे हा 'स्टॉप टीबी पार्टनरशिप' कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.