-
ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट्स (Tractors and Farm Equipment - TAFE) लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन यांची सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या (Public Enterprises Selection Board - PESB) अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात (Central Public Sector Enterprises - CPSEs) उच्च व्यवस्थापन पदांची नेमणूक करण्यासाठी जबाबदार असलेल्या PESB च्या प्रमुखपदी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञाची नियुक्ती प्रथमच करण्यात आली आहे.