-
माजी केंद्रीय मंत्री श्री. विजय सांपला यांनी नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या (National Commission for Scheduled Castes - NCSC) अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली आहेत.
ठळक मुद्दे
-
२०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
-
NCSC ही सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी भारतीय घटनात्मक संस्था आहे.
-
अनुसूचित जातींचा सामाजिक-आर्थिक विकास करणे तसेच त्यांच्यावरील अत्याचार रोखण्याचे महत्वपूर्ण कार्य NCSC करते.
NCSC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NCSC म्हणजेच National Commission for Scheduled Castes अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग होय.
-
स्थापना वर्ष: १९ फेब्रुवारी २००४ रोजी NCSC ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NCSC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.