-
नाबार्डचे अध्यक्ष जी. आर. चिंतला यांनी आशिया पॅसिफिक ग्रामीण आणि कृषी पत संघटनेचे (Asia Pacific Rural and Agricultural Credit Association - APRACA) अध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारला आहे.
ठळक मुद्दे
-
डीपीके गुणसेकेरा यांच्याकडून त्यांनी सदर पदभार स्विकारला आहे.
APRACA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: APRACA म्हणजेच Asia Pacific Rural and Agricultural Credit Association अर्थात आशिया पॅसिफिक ग्रामीण आणि कृषी पत संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १९७७ साली APRACA ची स्थापना करण्यात आली होती.
-
प्रतिनिधित्व: APRACA आशिया-पॅसिफिक प्रदेशातील २१ देशांचे प्रतिनिधित्व करते.