-
निलेश शाह यांची भारतीय म्युच्युअल फंड्स संघटनेच्या (Association of Mutual Funds in India - AMFI) अध्यक्ष पदावर पुन्हा निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी २०१९- २०२० या कालावधीसाठी निलेश शाह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
-
सदर निर्णय हे मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत.
AMFI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: AMFI म्हणजेच Association of Mutual Funds in India अर्थात भारतीय म्युच्युअल फंड्स संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १९९५ साली AMFI ची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थेचा उद्देश: भारतीय म्युच्युअल फंड उद्योगास व्यावसायिक, निरोगी आणि नैतिक तत्वावर विकसित करणे, म्युच्युअल फंडधारकांच्या हितसंबंधांचे संरक्षण व संवर्धन करणे आणि सर्व क्षेत्रात मानके वाढविणे या उद्देशाने ही संस्था समर्पित आहे.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: वेंकटेश हे सध्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.
-
उपाध्यक्ष: सौरभ नानावटी हे सध्या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर आहेत.