• संजीव कुमार यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (Airports Authority of India - AAI) अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कुमार हे महाराष्ट्र केडरचे १९९३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) त्यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.

AAI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AAI म्हणजेच Airports Authority of India अर्थात भारतीय विमानतळ प्राधिकरण होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे AAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ एप्रिल १९९५ रोजी AAI ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष: संजीव कुमार हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.