• केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (Central Board of Direct Taxes - CBDT) अध्यक्ष पदावर पीसी मोदी यांच्या कार्यकाळात ३ महिन्यांसाठी वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • मोदी हे १९८२ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत.

  • फेब्रुवारी २०१९ मध्ये CBDT प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

CBDT बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CBDT म्हणजेच Central Board of Direct Taxes अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ होय.

  • स्थापना वर्ष: १९२४ साली CBDT ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे CBDT च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.