-
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरून व्हाईटमार्फत नुकतीच सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कॅमेरून व्हाईटने ४ कसोटी, ९१ एकदिवसीय आणि ४७ टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले आहे.
-
त्याने अनुक्रमे कसोटी क्रिकेटमध्ये १४६ धावा, एकदिवसीय सामन्यांत २०७२ धावा आणि टी-२० प्रकारामध्ये ९८४ धावा केल्या आहेत.
-
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १७७ सामन्यांत ३९.९१ च्या सरासरीने १०५३७ धावा केल्या आहेत.