• ब्रिक्स गेम्स (BRICS Games) २०२१ चे आयोजन करण्याची योजना भारताने आखली आहे. सदर स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया गेम्ससोबत (Khelo India Games) करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी ब्रिक्स (BRICS) राष्ट्रांच्या (Brazil, Russia, India, China and South Africa) क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर सदर घोषणा करण्यात आली आहे.

  • भारताला २०२१ सालामध्ये ५ देशांच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय गटाचे अध्यक्षपद मिळणार आहे.

  • ब्रिक्स गेम्स (BRICS Games) २०२१ खेलो इंडिया गेम्स २०२१ च्या दरम्यान त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येतील जेणेकरुन खेलो इंडिया गेम्ससाठी एकत्रित येणाऱ्या देशातील विविध भागातील खेळाडूंना ब्रिक्स गेम्सचे साक्षीदार होण्याचा फायदा होईल.

'ब्रिक्स'विषयी महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ब्रिक्स (BRICS) Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांची मिळून असणारी संघटना आहे. ब्रिक नावाने सुरुवातीला ४ देशांचे गटबंधन झाले होते. २०१० साली दक्षिण आफ्रिका सामील होऊन ब्रिक्स (BRICS) असे नाव प्रचलित झाले.

  • स्थापना वर्ष: २००९ साली ब्रिक्स (BRICS) ची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: आर्थिक, राजकीय आणि प्रादेशिक सहकारी संस्था या स्वरूपाने ही संस्था सध्या कार्यरत आहे.

  • कार्यालयीन भाषा वापर: पोर्तुगीज, रशियन, हिंदी, चीनी आणि इंग्रजी या भाषांचा कार्यालयीन भाषा म्हणून वापर करण्यात येतो.