-
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) डेप्युटी गव्हर्नर असणारे बी. पी कानुन्गो नुकतेच निवृत्त झाले आहेत.
ठळक मुद्दे
-
२०१७ मध्ये त्यांची ३ वर्षांसाठी डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
-
२०२० मध्ये त्यांची मुदत आणखी १ वर्षासाठी वाढविण्यात आली होती.
-
राजेश्वर राव, एम. के. जैन आणि मायकेल पात्रा हे RBI चे अन्य डेप्युटी गव्हर्नर आहेत.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.