-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळामार्फत (Board of Control for Cricket in India - BCCI) जिओ (Jio) ला महिलांच्या टी-२० चॅलेंज (Women’s T-२० Challenge) २०२० च्या आवृत्तीचे शीर्षक प्रायोजक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर भागीदारीला रिलायन्स फाउंडेशन एज्युकेशन स्पोर्ट्स फॉर ऑल (Reliance Foundation Education and Sports For All - RF ESA) चे देखील सहकार्य असेल.
-
ही एक ऐतिहासिक स्वरूपाची भागीदारी आहे कारण प्रथमच एखाद्या प्रायोजकांतर्फे BCCI सोबत केवळ महिलांच्या सामन्यांसाठी करार करण्यात आला आहे.
-
जिओ महिलांचे टी-२० चॅलेंज शारजाह येथे ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल.
-
व्हेलॉसिटी, सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर हे ३ संघ IPL च्या अंतिम सामन्याच्या १ दिवस आधी म्हणजेच ९ नोव्हेंबरला अंतिम फेरीतील स्पर्धकांच्या निवडीसाठी एकमेकांशी भिडतील.
BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय.
-
अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
सचिव: जय शाह हे सध्या BCCI सचिव म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना करण्यात आली होती.
-
पुरुष संघ प्रशिक्षक: रवी शास्त्री हे सध्या पुरुष संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
-
महिला संघ प्रशिक्षक: डब्ल्यू. व्ही. रमण हे सध्या महिला संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.