• आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council - ICC) मंडळाच्या बैठकीसाठी जय शाह यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (Board of Control for Cricket in India - BCCI) अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • शाह हे सध्या BCCI चे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

  • सध्या ICC मंडळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची जागा शाह घेतील.

  • आरोग्याच्या कारणास्तव सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करावे लागत्यामुळे या पदावर शाह यांची वर्णी लागली आहे.

BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय.

  • अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • सचिव: जय शाह हे सध्या BCCI सचिव म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना करण्यात आली होती.

  • पुरुष संघ प्रशिक्षक: रवी शास्त्री हे सध्या पुरुष संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

  • महिला संघ प्रशिक्षक: डब्ल्यू. व्ही. रमण हे सध्या महिला संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.