• आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) युएईचे माजी खेळाडू मोहम्मद नाविद आणि शैमान अन्वर बट्ट यांच्यावर क्रिकेटच्या सर्व प्रकारांवर ८ वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २०१९ मध्ये टी - २० विश्वचषक पात्रता सामन्यादरम्यान सामने निश्चित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सदर कारवाई करण्यात आली.आहे 

  • जानेवारी २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक संहितेचा भंग केल्याबद्दल ते दोषी आढळले आहेत.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.