-
लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) याने नुकताच २०२० सालाचा 'बहरीन ग्रँड प्रिक्स (Bahrain Grand Prix)' जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर शर्यत २०२० फॉर्म्युला वन जागतिक चॅम्पियनशिपची १५ वी फेरी होती.
-
हॅमिल्टनचा हंगामातील हा ११ वा तसेच एकूण कारकिर्दीतील ९५ वा एफ १ विजय आहे.
-
फॉर्म्युला १ च्या इतिहासात हॅमिल्टनने आजतागायत सर्वाधिक ९५ विजय मिळवून विक्रम प्रस्थापित केला आहे.
-
मॅक्स व्हर्स्टापेन (नेदरलँड्स) आणि अलेक्झांडर अल्बॉन (थायलंड) अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.