-
अशोक लवासा यांनी भारतीय निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांना त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. सप्टेंबर २०२० पासून लवासा हे फिलिपिन्स येथे स्थित आशियाई विकास बँकेचे (Asian Development Bank - ADB) उपाध्यक्ष म्हणून रुजू होणार आहेत.
ठळक मुद्दे
-
अशोक लवासा हे हरियाणा केडरचे १९८० च्या बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service - IAS) अधिकारी आहेत.
-
भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी २३ जानेवारी २०१८ रोजी पदभार स्वीकारला होता .
-
सुशासन आणि धोरण सुधारणेसाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल ते खूप प्रसिध्द आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाबाबत (Election Commission of India - ECI) महत्वपूर्ण माहिती
-
मुख्य निवडणूक आयुक्त: सुनील अरोरा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.