-
केंद्र सरकारमार्फत नुकतीच अनुप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
पांडे हे १९८४ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
-
निवडणूक आयोगामध्ये पांडे फेब्रुवारी २०२४ मध्ये सेवानिवृत्त होतील.
ECI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग
-
मुख्य निवडणूक आयुक्त: सुशील चंद्र हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.