-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत (Reserve Bank of India - RBI) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (Punjab and Maharashtra Co-operative - PMC) बँकेचे नवे प्रशासक म्हणून ए. के. दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
जे. बी. भोरिया यांनी आरोग्यासंबंधीच्या कारणास्तव बँकेच्या प्रशासकाच्या भूमिकेतून माघार घेतल्यानंतर श्री. दीक्षित यांनी त्यांची जागा घेतली आहे.
PMC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: PMC म्हणजेच Punjab and Maharashtra Co-operative अर्थात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक होय.
-
स्थापना वर्ष: १९८४ साली PMC बँकेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे PMC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय आहे.
-
स्थापना वर्ष: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.