-
कार्मिक मंत्रालयानुसार (Personnel Ministry) बाजार नियामक SEBI च्या अध्यक्षपदी अजय त्यागी यांना १८ महिन्यांची मुदतवाढ करून देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यागी यांच्या कार्यकाळात १८ महिन्यांसाठी मुदतवाढ केली आहे.
-
सदर मुदतवाढ १ सप्टेंबर २०२० पासून २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीसाठी लागू होईल.
SEBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९८८ साली SEBI ची स्थापना झाली. १९९२ साली त्यास वैधानिक दर्जा प्राप्त झाला.
-
सध्याचे अध्यक्ष: अजय त्यागी हे सध्या SEBI च्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे SEBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.