• रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport and Highways - MoRTH) सचिव श्री. अरामाने गिरीधर यांच्याकडे 'भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India - NHAI)' च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • NHAI चे विद्यमान अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांची उत्तराखंडच्या नूतन मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

NHAI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NHAI म्हणजेच National Highways Authority of India अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण होय.

  • स्थापना वर्ष: १९९५ साली NHAI ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NHAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • उद्दिष्ट: राष्ट्रीय महामार्गांचा विकास व देखभाल करणे हे NHAI चे महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे.

  • ब्रीदवाक्य: 'Not just Roads, building a Nation' हे NHAI चे ब्रीदवाक्य आहे.