भारताच्या सुरुची सिंग आणि कमलजीत यांनी नुकतेच दक्षिण कोरियाचा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे:

  • या विजायासोबतच ४८४.६ गुणांसह भारताने आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • हा विजय मिळवल्यामुळे ऐची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांनी नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे.
  • अंतिम फेरीत भारतीय नेमबाजांनी दक्षिण कोरिया आणि इराणला मागे टाकत आशियाई विक्रम नोंदवला.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जिंकलेले हे दुसरे सुवर्णपदक होते.

१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेतील विजेते (देश-प्राप्त गुण-प्राप्त पदक):

  • १. भारत (४८४.६ गुण) - सुवर्ण पदक
  • २. दक्षिण कोरिया (४७८.० गुण) - रौप्य पदक
  • ३. इराण (४१५.८ गुण) - कांस्य पदक