नुकतीच 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI)' मार्फत विजय शंकर यांची २०२६-२७ या कालावधीसाठी 'अध्यक्ष-निवड' (President-Elect) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- FICCI ने 'द सॅनमार ग्रुप'चे (The Sanmar Group) अध्यक्ष विजय शंकर यांची २०२६-२७ या कालावधीसाठी 'अध्यक्ष-निवड' (President-Elect) म्हणून नियुक्ती केली आहे.
- मुंबई, महाराष्ट्र येथे झालेल्या FICCI च्या 'नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी मीटिंग' (NECM) मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
- ते सध्या FICCI चे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच 'द सॅनमार ग्रुप'चे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
इतर पदे/जबाबदाऱ्या:
- अध्यक्ष आणि गैर-कार्यकारी संचालक - 'केमप्लास्ट सॅनमार लिमिटेड' (Chemplast Sanmar Limited)
- स्वतंत्र संचालक, संचालक मंडळ - 'टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड' (TVS Motor) आणि 'लार्सन अँड टुब्रो लिमिटेड' (L&T)
- डेन्मार्कचे मानद वाणिज्य दूत - चेन्नई, तामिळनाडू येथे