आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नुकतेच भारताने मिश्र ४x४०० मीटर रिलेमध्ये रौप्य पदक तसेच महिलांच्या १०,००० मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीने कांस्य पदक पटकाविले आहे. 

ठळक मुद्दे:

  • या कामगिरीसह भारताच्या खात्यात ॲथलेटिक्समधील २ पदके जमा झाली आहेत.
  • एम.आर. पूवम्मा, विशाल टी.के., मनू टी.एस. आणि विथ्या रामराज यांचा समावेश असणाऱ्या मिश्र ४x४०० मीटर रिले संघामार्फत ३:१४.४६ मिनिटांची वेळ नोंदवत रौप्य पदकावर मोहर उमटविली आहे.
  • बहरीनच्या संघाने ३:१२.८७ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक तर व्हिएतनामने ३:१४.५४ मिनिटांच्या वेळेसह कांस्य पदक मिळवले आहे.
  • यासोबतच सीमा कुमारी हिने महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत ३२:५०.०५ मिनिटांची वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकतानाच भारताचा या प्रकारातील १६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे.

मिश्र ४x४०० मीटर रिले पदक विजेते:

  • १. बहरीन - सुवर्ण पदक
  • २. भारत - रौप्य  पदक
  • ३. व्हिएतनाम - कांस्य पदक