-
इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे.
ठळक मुद्दे
-
भारताच्या अनिल कुंबळेच्या ६१९ कसोटी बळींच्या विक्रमाला मागे टाकत त्याने या नव्या विक्रमला गवसणी घातली आहे.
-
भारत-इंग्लंड दरम्यान सध्या सुरु असणाऱ्या कसोटी मालिकेत भारताचा सलामीवीर के. एल. राहुलचा बळी घेताना त्याने ही मोठी कामगिरी केली आहे.
-
१६३ कसोटींमध्ये त्याने आजपर्यंत ६२१ बळी घेतले आहेत.
-
त्याच्यापुढे आता फक्त ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि श्रीलंकेचा मुथैय्या मुरलीधरन हे गोलंदाज आहेत.