-
भारतातील 'महिलांचा आशियाई चषक (Women’s Asian Cup)' मुंबई व पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
आशियाई फुटबॉल संघटनेमार्फत (Asian Football Confederation - AFC) पूर्वनियोजित भुवनेश्वर आणि अहमदाबाद या ठिकाणांमध्ये बदल करताना हा पर्याय निवडण्यात आला आहे.
-
२० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सदर स्पर्धा संपन्न होणार आहेत.
-
सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करण्यासाठी तसेच जैव-सुरक्षित बबलसाठी 'इष्टतम वातावरण' मिळवून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.