• सीमा रस्ते संघटना (Border Roads Organization - BRO) मध्ये अधिकारी कमांडिंग म्हणून नियुक्त होणाऱ्या वैशाली हिवासे या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

ठळक मुद्दे

  • भारत-चीन सीमा रस्ता मार्गे संपर्क साधण्याची जबाबदारी त्यांचीच असेल.

  • वैशाली या महाराष्ट्रातील वर्धा येथील रहिवाशी आहेत.

BRO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BRO म्हणजेच Border Roads Organisation अर्थात सीमा रस्ते संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: ७ मे १९६० रोजी BRO ची स्थापना करण्यात आली होती.

  • संस्थापक: जवाहरलाल नेहरू हे BRO चे संस्थापक आहेत.

  • सेवा प्रदान प्रदेश: भारत, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ आणि म्यानमार या प्रदेशांना BRO मार्फत सेवा प्रदान करण्यात येते.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: ' श्रमेन सर्वम साध्यम' हे BRO चे ब्रीदवाक्य आहे.