• नागरी उड्डयन मंत्रालयाच्या (Ministry of Civil Aviation) सहसचिव उषा पाध्ये यांच्यावर नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोच्या (Bureau of Civil Aviation Security - BCAS) महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या त्या पहिल्या महिला व तिसर्‍या आयएएस (IAS) अधिकारी आहेत.

  • उषा यांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीची मुदत १६ जुलै २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे.

  • १७ ऑगस्ट २०२० रोजी सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force - BSF) महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या राकेश अस्थाना (IPS) यांच्यानंतर त्यांची नियुक्ती होईल.