-
दिल्ली उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश हिमा कोहली यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या नूतन मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या आहेत.
-
न्यायमूर्ती कोहली यांना तेलंगणाचे राज्यपाल तमिलीसाई सौंदराराजन यांनी शपथ दिली.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.