• इंग्लंडचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जेम्स अँडरसन क्रिकेटच्या कसोटी प्रकारामध्ये ६०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने या विश्वविक्रमला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे

  • पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना अझर अली या खेळाडूला बाद करताना त्याने हा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

  • श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि भारताचा अनिल कुंबळे या दिग्गज निवृत्त गोलंदाजांनंतर ६०० कसोटी बळी घेणारा तो जगातला चौथा गोलंदाज बनला आहे.

  • अँडरसनने २००३ साली झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून आपले कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

  • २०१८ मध्ये ओव्हल येथे अँडरसनने भारताच्या मोहम्मद शमीला बाद केले होते.

  • त्याचा बळी मिळवून तो आत्तापर्यंत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत ५६३ कसोटी बळींसह अव्वल स्थानी असणाऱ्या ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडणारा वेगवान गोलंदाज ठरला होता.