-
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो टी-२० सामन्यांमध्ये ५०० बळी टिपणारा क्रिकेटमधील पहिला गोलंदाज ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
कॅरिबियन प्रिमीयर लीग (Caribbean Premier League - CPL) २०२० स्पर्धेदरम्यान ब्राव्होने आपला संघ ट्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) आणि सेंट लुसिया झुक्स (St Lucia Zouks) यांच्यातील सामन्यात हे विश्वविक्रमी यश संपादन केले आहे.
-
ब्राव्होने रहकीम कॉर्नवॉल याची विकेट घेत आपल्या ५०० व्या बळीची नोंद केली.
-
मर्यादित षटकांच्या खेळात ड्वेन ब्राव्होने आपल्या ४५९ व्या सामन्यात ही कामगिरी संपादन केली आहे.
-
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा टी-२० क्रिकेटमध्ये ३८९ बळींसह दुसर्या क्रमांकावर विराजमान आहे.
-
मलिंगानंतर सुनील नारायण, इम्रान ताहिर आणि सोहेल तनवीर यांचा क्रमांक लागतो.