• लॉस एंजेलिस लेकर्सने (Los Angeles Lakers) मियामी हीटचा (Miami Heat) पराभव करून राष्ट्रीय बास्केटबॉल संघटना (National Basketball Association - NBA) चॅम्पियनशिप २०२० चे अजिंक्यपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • लॉस एंजेलिस लेकर्ससाठी हे NBA चे १७ वे विजेतेपद ठरले आहे

  • लेकर्स संघाच्या लेब्रॉन जेम्स याला त्याच्या कारकीर्दीत चौथ्यांदा NBA च्या अंतिम स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू (Most Valuable Player - MVP) म्हणून गौरविण्यात आले आहे.

NBA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NBA म्हणजेच National Basketball Association अर्थात राष्ट्रीय बास्केटबॉल संघटना होय.

  • स्थापना वर्ष: ६ जून १९४६ रोजी NBA ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: युनायटेड स्टेट्समधील न्यूयॉर्क येथे NBA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.