• 'निसर्गासाठी जगातिक निधी (World Wide Fund for Nature) इंडिया' मार्फत अपोलो हॉस्पिटलच्या संचालक उपासना कामिनेनी यांची ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फॉरेस्ट फ्रंटलाईन हिरोज (Ambassador of Forest Frontline Heroes)’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • रुग्णालयांमध्ये तसेच वन्यजीव संरक्षणाच्या ठिकाणांमधील कामगारांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याच्या उद्देशाने सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • फ्रंटलाईन फॉरेस्ट कर्मचारी बहुधा स्थानिक समुदाय सदस्य असतात.

  • समुदाय आणि संवर्धन यांदरम्यान सुसंवाद निर्माण करण्यात ते अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

WWF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: WWF म्हणजेच World Wide Fund for Nature अर्थात निसर्गासाठी जगातिक निधी होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅन्ड, स्वित्झर्लंड हे WWF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २९ एप्रिल १९६१ रोजी मॉर्गेस, स्वित्झर्लंड येथे WWF ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: कार्टर रॉबर्ट्स हे सध्या संस्थेच्या या पदावर कार्यरत आहेत.