-
दिल्लीची प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांच्यामार्फत प्रदूषण विरोधी ‘युध्द प्रदूषण के विरुद्ध (Yudh Pradushan Ke Virudh)’ या अभियानाचे अनावरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
दिल्लीतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही धूळ विरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
-
सदर मोहीमेचा एक भाग म्हणून पुसा कृषी संस्थेमार्फत विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग भुसा जाळण्याच्या क्रियेचा धोका आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
-
प्रदूषणाशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी सरकारमार्फत ‘ग्रीन दिल्ली’ हे अॅप सुरू करण्यात येणार आहे.
दिल्लीबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.
-
राज्यपाल: अनिल बैजल सध्या दिल्लीचे राज्यपाल आहेत.
-
राजधानी म्हणून निर्मिती: १९११ साली दिल्लीला राजधानीचा दर्जा प्रदान करण्यात आला होता.
-
केंद्र शासित प्रदेश म्हणून निर्मिती: १९५६ साली दिल्लीला केंद्र शासित प्रदेश म्हणून दर्जा प्राप्त झाला होता.
-
राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून निर्मिती: १ फेब्रुवारी १९९२ पासून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून दर्जा प्रदान करण्यात आला होता.