• आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या हस्ते नुकतीच ‘वायएसआर बिमा (YSR BIMA)’ नावाची योजना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू किंवा काही दुर्घटना झाल्यास विमा संरक्षणाद्वारे आर्थिक मदत दिली जावी अशी तरतूद सदर योजनेत करण्यात आली आहे.

  • श्वेत रेशनकार्ड धारक असणारी सर्व कुटुंबे सदर योजनेस पात्र आहेत.

आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.

  • राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.