• आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 'वायएसआर आसरा योजनेचे' अनावरण केले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजना ही 'नव रत्नाळू' अंमलबजावणीचा एक भाग आहे.

  • ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रय निर्मूलन आणि उत्पादकता सुधारण्याच्या वचनबद्धतेने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.

  • राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.